🕒 1 min read
औरंंगाबाद : गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या जमीर खान दिलावर खान (वय २८, रा. बारी कॉलनी) आणि ऋषीकेश काकासाहेब कताडे (वय २४, रा. आंतरवासी खांडी ता. पैठण) या दोघांची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी रविवारी (दि.६) दिले.
चिकलठाणा पोलिस ठाण्याचे नाईक नागलोद यांनी ३ जून रोजी रात्री औरंगाबाद-बीड रोडवरील झाल्टा फाटा येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या जीप क्रमांक (एमएच-०४-सीजी-८५९६) चा चालक जमीर खान याला पकडले होते. पोलिसांनी जीपची झडती घेतली असता ६३ हजार ७६ रूपये किंमतीचा गुटखा मिळून आला होता.
पोलिसांनी गुटख्याचा साठा व जीप असा एकूण १ लाख १३ हजार ७६ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.चौकशीदरम्यान जमीर खान याने सदरील गुटखा ऋषीकेश कताडे यांच्याकडून खरेदी केला असल्याची कबूली दिली होती. त्यामुळे पोलसिांनी ऋषीकेश कताडे याला देखील अटक केली होती. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात जमीर खान व ऋषीकेश कताडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
