🕒 1 min read
नवी दिल्ली: लवकरच ५ राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वी अनेक आमदारांच्या पक्षबदलीच्या कार्यक्रमांचेच अधिक धक्के पक्षांना भेटत आहे. भाजपनंतर आता समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच काँग्रेसलाही हा धक्का लागला आहे.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सहारणपूरमधील बेहात मतदारसंघाचे आमदार नरेश सैनी(Naresh Saini), फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरीओम यादव (Hariom Yadav) यांचा याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार धर्मपालसिंह (Dharmapal Singh) यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. यात विशेष म्हणजे हरीओम यादव हे अखिलेश यादव यांचे नातेवाईक आहेत.त्यामुळे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हरीओम यादव हे अखिलेश यादव यांचे मामा आहेत. हरी ओम यादव यांना समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान भाजपनंतर आता समाजवादी पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे. कालच स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्यासह पाच आमदारांनी भाजपला राजीनामा दिला आहे. आता सपाच्या आमदारांनी भाजपशी गाठ जोडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्राद्वारे राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
- हॉटेल, मॉल्स ५०% क्षमतेने सुरु; मग पर्यटन स्थळेच लॉक का? आ. अंबादास दानवेंची बंदी हटवण्याची मागणी!
- अनन्या पांडेला कुणी दिलं ‘खास गिफ्ट’ ; जाणून घ्या
- जिल्हाधिकार्यांनंतर मनपा आयुक्त पांडेय यांनी घेतला ‘बुस्टर डोस’; ६० मनपा कर्मचाऱ्यांचाही समावेश!
- विठ्ठल भक्तीत रंगलेल्या अमिताभ बच्चनच्या “त्या” ट्विटने वेधले लक्ष ; खा. सुप्रियानीं ही केली कमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
