मुंबई : अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Pandey) बॉलिवूडमध्ये तिची खास ओळख निर्माण केली आहे. अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ (film ‘Student of the Year 2’) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम एका खास फोटो शेअर केला असून याबद्दल चर्चा होत आहे.
दरम्यान अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट एक फोटो शेअर केला आहे. यात ती एका सुंदर पोर्टेटसमोर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. हे पोर्टेट फार वेगळे आणि अनोखे असून अनन्याने ही पोर्टेट फ्रेम तिच्या घराच्या भिंतीवर लावली आहे. विशेष म्हणजे ही फ्रेम तिला गिफ्ट (special gift) म्हणून मिळाली आहे. अनन्याला मिळालेली ही भेट खास असल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिने तिला हे अनोखे पोर्टेट भेट म्हणून दिले आहे.

गौरीने अनन्याला दिलेली ही भेट एक आर्टवर्क आहे. हे आर्टवर्क एक रंगेबेरंगी ( silhouette) प्रकारातील आहे. यात एका महिलेचा चेहरा पाहायला मिळत आहे. यात अनेक आधुनिक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हे एक मल्टीकलर पोर्टेट असल्याने ते दिसायला फार छान दिसत आहे. गौरीने अनन्याला दिलेली भेटवस्तू तिला प्रचंड आवडली आहे. तिने ‘आय लव्ह इट, स्टनिंग, वाह..’ असे म्हणत तिचा आनंद व्यक्त केला आहे. अनन्याने त्या पोर्टेटसारखी पोज देत काढलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनन्याने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत तिने धन्यवाद गौरी आंटी, माझ्यासाठी हे बनवल्याबद्दल, असे तिने म्हटले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक कमेंट येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!
- ‘…हे तर बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक’; १२ आमदारांच्या निलंबनावर राम कदमांची प्रतिक्रिया
- विठ्ठल भक्तीत रंगलेल्या अमिताभ बच्चनच्या “त्या” ट्विटने वेधले लक्ष ; खा. सुप्रियानीं ही केली कमेंट
- “पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही,” संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रमधून गोव्यात गेले अन् भाजपला गळती लागली”, राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

