Share

जिल्हाधिकार्‍यांनंतर मनपा आयुक्त पांडेय यांनी घेतला ‘बुस्टर डोस’; ६० मनपा कर्मचाऱ्यांचाही समावेश!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी तर मंगळवारी (दि.११) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) तसेच अतिरिक्त मनपा आयुक्त बी.बी.नेमाने, उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह तिसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या महानगरपालिकेच्या ६० कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे.

फ्रंटलाईन वर्कर्स, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मनपा मुख्यालयात बूस्टर डोस देण्यात आला. बुधवारीही मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मोहीम सुरू राहणार आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व साठ वर्षावरील( ज्येष्ठ) नागरिकांना देण्यात येत आहे. ज्यांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशाच लाभार्थींना डोस देण्यात येत आहे. शहरात ९० टक्के लसीकरण झाले असून दुसरा डोस ५० टक्क्यांच्या पुढे आहे. लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाने वाॅर्डावाॅर्डात शिबिरे आयोजित करत आहेत.

डोस घेण्यासाठी उर्वरित नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन महानगरपालिका आरोग्य कर्मचारी डोस देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस केंद्र सरकारच्या गाईड लाईन नुसार महानगरपालिकेच्या वतीने पात्र लाभार्थींना देण्यात येत आहे. मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रवींद्र निकम यांनी तिसरा डोस घेतला असून महानगरपालिकेच्या सर्व विभागातील पात्र अधिकारी व हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर यांनाही बुस्टर डोस देण्यात येणार असून मंगळवारी साठ कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आले.

काय म्हणाले आयुक्त पाण्डेय

यावेळी मनपा आयुक्त पाण्डेय म्हणाले, केंद्र सरकारच्या (गाईडलाईन्स)मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या असून भाजी मंडीच्या ठिकाणी पथके तयार करण्यात आली आहेत. गर्दी करू नये , सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर आदींबाबत भाजी विक्रेता आणि ग्राहकांना गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत, असे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!