🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारद्वारे निर्बंध लावण्यात येत आहेत. यामध्ये आता पर्यटनस्थळांवर बंदी लावण्यात आली आहे. मात्र त्या तुलनेत हॉटेल्स, मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. गेल्या २ वर्षांच्या काळात पर्यटन व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आणि आता पुन्हा पर्यटनस्थळांना लॉक करण्यात आल्याने हे व्यवसायिक पूर्णतः कोलमडून पडतील. मॉल्स, हॉटेलच्या धर्तीवर पर्यटन स्थळी ५० टक्के शांततेने प्रवेश देण्यात यावा अशी मागणी व्यवसायिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांना पत्र लिहिले आहे.
पर्यटन स्थळे बंद केल्यामुळे यावर उपजीविका असणारे गाईड, कार- बस आणि टॅक्सी ऑपरेटर, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि पर्यटन उद्योगातील छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यावर आर्थिक ताण पडेल. त्यांच्यावर मानसिक दृष्ट्या नकारात्मक प्रभाव वाढत आहे. त्यामुळे याचा विचार करून राज्यातील पर्यटन स्थळे ५० टक्के उपस्थितीत व निर्बंधासह सुरू करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या पत्रात म्हटले आहे, मागील दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीशी आपण लढत असताना दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनास पोषक वातावरण निर्माण झाले होते.
नोव्हेंबर २०२१ नंतर अर्थचक्र पूर्वपदावर येत असतानाच ओमायक्रोन आणि वाढत्या रुग्णसंख्येने यात आडकाठी निर्माण केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ऐन हंगामात पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे पर्यटन स्थळावर उपजीविका असणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व मानसिक दृष्ट्याही खचत आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून जसे हॉटेल, सिनेमा थिएटर, खाजगी कार्यालय व इतर ठिकाणी ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिलेली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील पर्यटन स्थळे निर्बंध लावून खुली करण्यात यावी अशी मागणी आमदार दानवे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रमधून गोव्यात गेले अन् भाजपला गळती लागली”, राऊतांचा टोला
- मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
- “अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका
- भाजपच्या त्या १२ आमदारांचं निलंबन कायद्यानेच; राज्यसरकारचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
