Share

विठ्ठल भक्तीत रंगलेल्या अमिताभ बच्चनच्या “त्या” ट्विटने वेधले लक्ष ; खा. सुप्रियानीं ही केली कमेंट

Published On: 

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमिताभ हे चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, संवाद साधत असतात. नुकतच त्यांनी एक फोटो शेअर केला असून नेटकऱ्यांची लक्ष वेधत आहे.

दरम्यान अमिताभ यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचा फोटो नुकताच ट्विट (Tweet) करत दर्शन घेतले आहे. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाख परिधान करुन दररोज नित्य पूजा तसेच काकड आरती केली जाते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. मंदिर समितीच्या वतीने ट्विटरवर शेअर केलेले फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्ट करत प्रार्थना केली आहे.

“श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ नित्य पुजा काकडा आरती राम कृष्ण हरी”  म्हणत अमिताभ बच्चन यांनी श्री विठ्ठलाचा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट केलेल्या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. सुप्रीया सुळे यांनी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोवर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी कमेंट केली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना देवाकडे प्रार्थना केली होती. तसेच चाहत्यांनी देखील लाईक, कमेंट केली होती.

दरम्यान, ओमायक्रॉनच्या संभाव्य भीतीपोटी येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनाची वेळ तासाभराने कमी केली आहे. पूर्वी रात्री १० पर्यंत दर्शनासाठी खुले असणारे मंदिर आता दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!