Share

दामदुपटीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघे गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : आमच्याकडे खुप पैसे असून असून तुम्हाला दुप्पट पैसे देतो असे सांगून व्यापाऱ्याची १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील दोन जणांना ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. अटकेत असलेल्या दोघांकडून पोलिसांनी रोख रक्कम, पाच मोबाईल असा एकूण ३ लाख २४ हजार ४५५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हारूण शेख छोटु (वय ३८, रा.दुखीनगर,जुना जालना), अस्लम इब्राहीम कुरैशी (वय ४६,रा.आनंदनगर, नुतन वसाहत,जालना) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फसवणूक करणा-यांची नावे आहेत. तर शेख भिकन शेख मिठ्ठू (रा.बोरी,ता.मेहकर,जि.बुलढाणा) व त्याचा एक साथीदार फरार आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील व्यापारी राजु बाबूलाल शिंदे (वय ४२) यांच्या दुकानावर महिनाभरापुर्वी काळे पाटील व सुनील नावाचे दोन जण आले होते, त्यावेळी दोघांनी आम्ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून आलो असून आमच्याकडे खुप पैसे पडलेले आहेत, तुम्ही आम्हाला दहा लाख रूपये द्या आम्ही तुम्हाला २० लाख रूपये देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ३ जून रोजी काळे पाटील व सुनील यांनी राजु शिंदे यांना तुम्ही दहा लाख रूपये घेवून भोकरदन रोडने सिल्लोड येथे या असे सांगितले. राजु शिंदे हे दहा लाख रूपये घेवून गेले असता तेथे असलेल्या दोन जणांनी शिंदे यांच्याजवळील दहा लाख रूपयांची बॅग घेवून पोबारा केला होता. त्यावेळी शिंदे यांना मिळालेली बॅग त्यांनी तपासली असता त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, जमादार नामदेव सिरसाठ,संजय काळे,प्रमोद खांदेभराड, विक्रम देशमुख, बालू पाथ्रीकर, किरण गोरे, वाल्मीक निकम, राहुल पगारे, शेख नदीम, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले,योगेश तरमाळे, संजय तांदळे, संतोष डमाळे आदींच्या पथकाने तांत्रीक तपास करून शेख हारूण शेख छोटु व अस्लम इब्राहीम कुरैशी यांना गजाआड केले. ऑप

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!