Share

जवळी परिसरात आढळले बिबट्याचे दोन बछडे

Published On: 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जवळी परिसरातील कडुबा शिनगारे यांच्या शेतात ऊस तोड सुरु असतांना २ बिबटयाचे बछडे दिसले.त्यामुळे उसतोड कामगार भयभीत झाले. या बाबत माहिती अशी जवळी येथील कडुबा शिनगारे यांच्या उसाची उसतोड सुरु होती.रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उसतोड कामगार उस तोड करत असतांना अचानक त्यांना बिबटयाचे २ बछडे दिसले.हे बछडे पाहुन त्यांनी शेतकरी कडुबा शिनगारे यांना सांगीतले.त्यांनी वनविभागाच्या कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला.

कन्नडच्या वनविभागाची टीम हज़र झाली. त्यांनी परिसरातील शेत शिवाराची पाहणी केली. दोन बछडा पैकी एक बछडा तेथून गायब होता.एक बछडा सुखरूप असून त्याला दूध पाजन्यात आले.या उसाच्या शेतात ट्रैप कॅमेरे बसवले असून वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असून त्या ठिकाणी लक्ष ठेऊन आहे.

त्यांच्या अंदाजा नुसार त्याची आई बछडयाला घेण्यासाठी त्या ठिकाणी कधीही येऊ शकते. वनविभागाने शेजारील वस्ती वरील शेतकरऱ्यांना सावधान केली आहे.या ठिकाणी रेंजर आनंद गायके,पी आर पेरकर, वनपाल अनिल पाटील, वनरक्षक एन. टी ताठे, एम ऐ शेख,एस .आर. पवार,वनमजूर भावलाल जाधव,अशोक आव्हाड,प्राणी मित्र श्रीकांत वाहुले,सागर कसाव आदि उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!