Share

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे

Published On: 

लातूर – जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच शहरी भागातील कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करुन, व्यापारी व फेरीवाल्यांच्याही कोव्हिड चाचण्या करण्या बाबतचे निर्देश राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज उदगीर येथील सभागृहात दिले.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे आदिसह मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर येथे कोव्हिडसाठी नियोजित असलेले ट्रामा केअर पूर्णत्वास आला असून येत्या 10 दिवसांत कार्यान्वीत करण्यात यावे तसेच वैद्यकीय सेवेसाठी अवश्यक असलेले रिक्त पदे भरण्यात यावे. लोकांच्या मनामधील कोरोनाची भिती लक्षात घेता कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने निर्बंध लावलेल्या नियमावलीचे कडक पध्दतीने अंमलबजावणी होणे अवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव फार मोठया प्रमाणात वाढत असून त्यासाठी कोरोना फोर्स सक्रीय करुन गावामधील लोकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, भौतिक अंतर पाळणे या बाबत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गांर्भीयाने काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील लोकांना मास्क लावण्यासाठी बंधनकारक करुन दंडात्मक कार्यवाही करण्या बाबत सूचित केले.

कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने जे निर्बंध लावले आहेत त्याचे सर्वानी काटेकोरपणे पालन केले तर कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी यश मिळेल असे ही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. सध्या चालू असलेली लसीकरण मोहिमेमध्ये 45 वर्षावरील नागरीकांना लस देण्यासाठी जनजागृती करुन नागरीकांनी लस घेण्याबाबत सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे व मोठया प्रमाणावर लसीकरणही होणे गरजेचे आहे असे त्यांनी सूचित केले.

कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग व टेस्टींग करुन मोठया प्रमाणात चाचण्या करुण रुग्णांना 15 दिवस कमीत कमी आयसोलेशन केंद्राच्या बाहेर कोणत्याही कोरोना बाधित रुग्णांना बाहेर न जाऊ देण्या बाबत त्यांनी आढावा बैठकीत सूचित केले. कोविड सेंटरमध्ये व कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत दर्जेदार / चवीष्ट देण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. रेमडिसीवीर या इंजेक्शनचा जिल्हयात होणारा काळा बाजार रोखण्यासाठी सदरील इंजेक्शन मूळ रकमेलाच रुग्णाला प्राप्त झाले पाहीजेत याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी.

जिल्हयातील सर्व नगर पालिका/ नगर पंचायत,आरोग्य विभाग, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी दररोज कोव्हीड बाबत आढावा बैठक घ्याव्या व एकमेकांशी समन्वय ठेवावा असे यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी उदगीर तालुक्यात नवीन कोरोना टेस्टींग लॅब उभारण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव पाठवावे असे सूचित केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!