Share

पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या

Published On: 

पुणे : राज्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे.

आज पुण्यामध्ये देखील असाच रेमडेसिव्हीरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली आहे. पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर अशी अटकेत असलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.

रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनकरता लांबच्या लांब रांगा लावत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!