मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चाचण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. यानंतर त्यांच्यावर ३१ मार्च रोजी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्रास जाणवू लागल्याने एक दिवस आधीच ते रुग्णालयात दाखल झाले होते.
यानंतर त्यांच्यावर यशस्वी शत्रक्रिया करण्यात आली होती. एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजत आहे. उद्या म्हणजेच १२ एप्रिल रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे ते आजच रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान, गेल्या वेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लगेचच पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. याबाबत, त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये ते रुग्णालयात वृत्तपत्र वाचत असल्याचे समोर आले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, त्यांना लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही’
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- ‘बीडच्या भाजप खासदार डॉ.प्रितम मुंडे हरवल्या आहेत!’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

