Share

‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’

Published On: 

नवी दिल्ली: सध्या गेल्या वर्षभरापासून जगासह देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. गेल्या वर्षी करुणा विरुद्ध लढण्यासाठी कोणताही योग्य उपचार उपलब्ध नव्हता मात्र यावर्षी कोरोना प्रतिबंधक लस आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान सध्या देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यात रुग्णसंख्या काही थांबण्याचं नाव घेत नसून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. यावर एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तरे दिली आहेत.

‘कोविडचा विषाणू बराच काळ राहील. पण लोकांची इम्युनिटी पावर वाढल्याने रुग्णसंख्या कमी होईल. त्यावेळी आता आढळतात त्याप्रमाणे रुग्ण आढळणार नाहीत. मात्र कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते. ज्यापद्धतीनं आपण एका तापाच्या साथीबाबत सहजपणे चर्चा करतो. त्याच पद्धतीनं कोरोना देखील सामान्य बाब होईल’, असं महत्वपूर्ण निरीक्षण डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावेळी नोंदवलं.

त्याचबरोबर ‘कोरोना लस हा या विषाणूवरील अंतिम उपाय नाही. ते एक फक्त हत्यार आहे की ज्यामाध्यमातून आपण आपली कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो. पण लसीपेक्षा कोविड संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार आहे’, असं स्पष्ट मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. तर लस घेतल्यावर देखील कोरोना होऊ शकतो मात्र त्यांनतर मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. असं देखील त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!