Share

बेघरांच्या आयुष्यात फुलले दोन क्षण सुखाचे; मनपाच्या बेघर निवारागृहात दिवाळीचा जल्लोष!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव. मात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात हा सण प्रकाश आणेलच असे नाही. या जगात अशी अनेक माणसे असतात ज्यांचे कुटूंब नसते, घर नसते. अशा लोकांनीही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा यासाठी बेघर निवारा केंद्राने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. शहरातील गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा एन-६ सिडको येथील निवारागृहात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

ज्यांना राहायला घर नाही, कपडे नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत अशांच्या आयुष्यामध्ये कायम अंधार असतो. मात्र औरंगाबाद महानगरपालिका आणि राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत चालविण्यात येत असलेल्या मोती कारंजा, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा आणि एन-६ सिडको येथील शहरी बेघर निवारागृहात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

यावेळी फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. बेघर लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची आणण्यासाठी नृत्य, गीत, संगीत सादर करण्यात आले. यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. याप्रसंगी व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भारत मोरे, डॉ. फारुख पटेल, प्रशांत दंदे, प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!