मुंबई : लक्ष्मी पूजनाचे निमित्य साधून अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, त्यांच्या घरातील दिवाळीचे फोटो शेअर करत आहेत. अशातच नवविवाहित जोडपे मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत. यानिमित्त मानसी नाईकने त्यांचे काही फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहे. या फोटोमध्ये मानसीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि चंदेरी रंगाचा ब्लाऊज घातले असून, नाकात शाही नथ घातली आहे. यासोबत केसांमध्ये गजरा माळून कपाळाला चंद्राची कोर लावली आहे. तसेच तिच्या पतीने चंदेरी रंगाचा कुर्ता आणि त्यावर जांभळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोमध्ये ते दोघे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CVuRUtnomYj/?utm_medium=copy_link
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, ‘कुमकुम भरे कदमों से लक्ष्मीजी आये आपके द्वार, सुखसमृद्धी मिले अपको अपरमपार. इस दिवाळीपर माता लक्ष्मीजी आपकी सभी तमन्नाये करे स्वीकार, शुभ दीपावली.’ या फोटोवर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्यांचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा ही देत आहेत. मानसीने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- भाजपचा पूर्ण पराभव झाल्यास पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होणार; राऊतांचा दावा
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- ‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला


