Share

’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यांच्या कारभारावर आरोप करत भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच बरोबर किरीट सोमय्यांनी आता 31 डिसेंबरला 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे.

आमचं महाराष्ट्राला कमिटमेंट आहे की, 31 डिसेंबर पर्यंत 40 चोरांचे घोटाळे काढून 1 जानेवारीला महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करणार आहे. दिवाळी आज आहे पण पाडवा मात्र 1 जानेवारीला असेल, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. दिवाळीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 105 कोटी जनतेचं लसीकरण केल्यामुळे मोदींवर स्तुतीसुमनेही उधळली आहेत.

यापूर्वी किरीट सोमय्यांनी राज्यातील अनेक नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावर ईडी, आयकर विभागाचे छापेमारीही झाली. भावना गवळी, अनिल देशमुख, हसन मुश्रिफ, अजित पवार, बजरंग खरमाटे, अशा अनेक नेत्यांवर आरोप केले. आता आणखी 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा दावा केला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या रडारवर असणारे हे 40 नेते नेमके कोण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!