Share

पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना दिला उजाळा

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या नौशेरा या सीमावर्ती भागात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. यावेळी मोदींनी जवानांसोबत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. तसेच यावेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नौशेराच्या जवानांनी गाजवलेल्या या सर्जिकल स्ट्राईकचे पंतप्रधानांनी कौतुक केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, आजही होतात. पण प्रत्येक वेळी इथे तोडीस तोड उत्तर दिलं जातं. असत्याविरुद्ध या मातीत एक स्वाभाविक प्रेरणा आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता. असेही पंतप्रधान म्हणाले.

सर्जीकल स्ट्राईकचा तो दिवस कायम माझ्या लक्षात राहील. मी ठरवलं होतं की सूर्यास्तापूर्वी सर्वजण परत यायला हवेत. मी प्रत्येक क्षण फोन वाजण्याची वाट पाहात होतो. माझा शेवटचा जवान पोहोचला का हे पाहात होतो. आणि आपलं कोणतंही नुकसान न होता आपले जवान यश मिळवून परत आले, असं पंतप्रधान म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला इतर देशांकडे झुकावं लागत होतं. जास्त पैसे खर्च करावे लागत होते. नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू असायची. एक अधिकारी प्रक्रिया सुरू करायचा, पण तो निवृत्त होईपर्यंत ती पूर्णच होत नव्हती. परिणामी जेव्हा गरज पडायची, तेव्हा शस्त्रास्त्र घाईगडबडीत खरेदी होत होती. अगदी सुट्या भागांसाठीही आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून असायचो. पण आता संरक्षण क्षेत्रातल्या स्वावलंबनाचा संकल्प त्या परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग आहे. देशाच्या उत्पन्नाचा ६५ टक्के हिस्सा देशांतर्गत उत्पादित गोष्टींवर खर्च होत आहे. असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!