Share

दौलताबाद अपघात प्रकरणी दोन दिवसानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : भरधाव जाणाऱ्या फोरच्र्युनर कारने दिलेल्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी रात्री रात्री साडेअकराच्या सुमारास दौलताबाद गावाजवळ घडली होती. या अपघात प्रकरणी दोन दिवसानंतर कारचालकाविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथून खुलताबाद जाणाऱ्या फोरच्र्युनर कार क्रमांक (एमएच-२०-सीएस-५४६२) ने दिलेल्या धडकेत कार क्रमांक (एमएच-२०-डीजे-१७७१) मधील दिपक पोपटराव खोसरे (वय ४७), राजू आसाराम मानकीकर (दोघे रा.गल्लेबोरगांव), मदन अशोक जगताप (वय २८, रा.मुकुंदवाडी) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर राजू वरकड (रा.मावसाळा, ता.खुलताबाद), सुनिल औटे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या अपघात प्रकरणी दोन दिवसानंतर फोरच्र्युनर कारचे मालक फरजान मिनाज खान (वय २५, रा.दर्जीबाजार, छावणी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार क्रमांक (एमएच-२०-डीजे-१७७१) च्या चालकाविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!