Share

तलवार बाळगल्याप्रकरणी दोन भावांना अटक

Published On: 

औरंगाबाद : तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कन्नड येथील दोघांना शुक्रवारी (दि.२१) खंडाळा जानेफळ रस्त्यावर अटक केली. विकास बरबंडे (२९) व अभिषेक बरबंडे (२५), रा.जय संतोषी माता कॉलनी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडुन ४० हजार रुपये किमतीची पितळी मुठ असलेली जुनी तलवार व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास खंडाळा जानेफळ रस्त्यावर दोन तरुण तलवार घेऊन दुचाकीवर फिरत असल्याची माहिती ठाणे अंमलदार एम.सी.निकाळजे यांना मिळाली. याबाबत त्यांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर उपनिरीक्षक विजय जाधव, सह.उपनिरीक्षक हुकुमसिंह डांगर, पोलिस नाईक मोईस बेग, विजय खोकड यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!