मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.
यातच अभिनेत्री मिलिंद सोमणला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने कोरोनावर मात केली असल्याचे सांगितले होते.
https://www.instagram.com/p/COCl1VVHvnR/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, नुकतीच मिलिंद सोमनने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, माझ्या एका 40 वर्षांच्या मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. माझ्यासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे. मला देखील सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहेत की, तुम्ही इतके फिट असूनही तुम्हाला कोरोनाची लागण कशी झाली. त्यावर मी त्यांना एकच सांगतो की, तुम्ही फिट आहात म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही असे नाहीये. पण तुम्ही फिट असल्याने तुम्ही त्यावर लवकर मात देऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
- शरद पवार यांच्या तोंडातील अल्सर काढला; तब्येत एकदम ठणठणीत
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- पालकमंत्री मलिक यांना हटवण्याची प्रहार संघटनेनी मागणी, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन


