🕒 1 min read
नांदेड: राज्यासह जिल्ह्यात कोरोन संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन खबरदारीचा उपाययोजना राबवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही स्थानिक प्रशासनासह पोलीस सुद्धा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्याना मोकळीक भेटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कंधार व सोनखेड पोलीस ठाण्यांतर्गत जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन घटनांमध्ये २ लाख २६,३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
कंधार तालुक्यातील शेल्लाळी शिवारातील महादेव मंदिराजवळील रस्त्यावर २१ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता यातील नमुद तीन आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीची दुचाकी अडविली. हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी ज्वेलर गोविंद फरकंडे यांच्या हातातील सोन्याची अंगठी, गळ्यातील सोन्याची चैन व रेडमी कंपनीचा मोबाईल यासह रोकड असा एकुण २ लाख ६ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
अन्य एका घटनेत सोनखेड येथील सुमीत पेट्रोलपंपासमोरील मोकळ्या जागेत २२ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता गजानन कदम हे एम.एच.२६ ए.डी.२३५० क्रमांकाच्या ट्रकमध्ये आराम करीत असताना अज्ञात चोरट्याने केबिनची काच फोडून १९,५०० रुपयांचा मोबाईल काढून घेतला. फिर्यादीने विरोध केल्याने त्यांना मारहाण करुन गंभीर दुखापत करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर
- ‘अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते’
- प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल-भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट व्हायरल
- ‘विरोधी पक्षाने सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले’
- धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड

