पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यात एका वेळेला इंग्लंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरणार असे वाटत असतानाच गोलंदाजांनी केलेल्या कमालीचा फायदा संघाला झाल्याचे पाहायला मिळाले. व नेमका हाच धागा पकडून भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर खेळाडूंचे कौतुक केले आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले होते. त्यानंतर टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांमध्ये पाच गडी गमावत 317 धावासंख्या उभारली. यावेळी भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 106 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 98 धावा केल्या.
याशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या कृणाल पांड्याने अर्धशतकीय खेळी साकारली. यानंतर भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरवात दमदार झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड संघाचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 135 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मधेच सामना भारताच्या हातातून निसटतो की काय असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा आपली कमाल दाखवत सामना आपल्या बाजूने वळवून घेऊन विजय मिळवला.
England going strong at 135/0 after 14.1 overs and then
Lord Shardul , Prasidh Krishna and Bhuvi pic.twitter.com/Tbc4MoAtxp— Virender Sehwag (@virendersehwag) March 23, 2021
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या नेमक्या याच खेळीचे कौतुक माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने केले आहे. वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावरील ट्विटरवर याबाबतचे एक मीम शेअर केले असून, ते नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल झाले आहे. यासोबतच त्याने एक भन्नाट कॅप्शन देखील या पोस्टला दिला आहे. वीरेंद्र सेहवागने पोस्ट केलेल्या मीम मध्ये, एकदम से वक्त बदल दिया, जजबात बदल दिया, जिंदगी बदल दी, असे लिहिलेले आहे. आणि या मीम सोबत त्याने इंग्लंडचा संघ 14.1 षटकात 135/0 अशा मजबूत स्थितीत असताना लॉर्ड शार्दुल, प्रसिद्ध कृष्णा आणि भुवी आल्याचे कॅप्शन दिले आहे. यांच्याबाबत केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

