पुणे : भारताकडून सलामीवीर शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावत सर्वाधीक ९८ धावा केल्या. शिखरचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. तर पदार्पण करणाऱ्या कृणाल पाड्यांने धडाकेबाज अर्धशतक झळकावले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अष्टपैलु कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध क्रृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली. शिखर-रोहित या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र अडखळत खेळणारा रोहित २८ धावावर असताना स्टोकस् च्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर धवनने कर्णधार कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
यादरम्यान कोहलीने ६ चौकारांच्या मदतीने आपले ६१वे अर्धशतक पुर्ण केले. ५६ धावावर बाद झाल्यानंतर धवनने मोर्चा संभाळत आपला तडाखा सुरुच ठेवला. शतकासाठी अवघ्या दोन धावा हव्या असताना शिखर धवन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कालच्या सामन्यात सलामीजोडी धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड मोडला.
रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन शानदार अर्धशतक ठोकले आणि सचिन-सेहवागचा मोठा विक्रम मोडला. सलामी जोडीने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतकी भागीदारीच्या रेकॉर्ड-बुकमध्ये सचिन आणि सेहवागच्या जोडीने 30 वेळा ही कामगिरी बजावली, तर धवन आणि रोहित यांच्यातील ही 31वी अर्धशतकी भागीदारी होती. रोहित-धवन जोडीने एकत्र 4911 धावांची भागीदारी केली. जॉनी बेअरस्टो आणि सलामी जोडीदार जेसन रॉय यांनीही इंग्लंडच्या सर्वाधिक शतकी भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी केली. 12 व्या वेळी रॉय आणि बियरस्टो यांच्यात 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. इयन मॉर्गन आणि जो रूट यांनी देखील 12 वेळा शतकी भागीदारी केली आहे.
जॉनी बेअरस्टोने 40 चौकार खेचत वनडे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक ठोकले. यांनतर, दोन्ही संघ शुक्रवार, 26 मार्च रोजी, पुन्हा एकदा मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील. या सामन्यात टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची सुवर्ण संधी असेल तर इंग्लंड मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

