🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने (Kangana Ranaut) १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. केवळ नेटकरी, बॉलिवूड सेलिब्रिटीसह आता छोट्या पडद्यावरील अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी कंगनावर तिच्या वक्तव्यावरून निशाना साधला असून त्यांनी शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
नुकतच मुकेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यामध्ये त्यांनी कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे. “बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला की आपल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावर तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा एखादे प्रसिद्ध सेलिब्रेटी अशाप्रकारची प्रतिक्रिया देतात तेव्हा वाईट वाटते. सरकारप्रती लाळघोटेपणा करणारेच अशाप्रकारे बोलू शकतात. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही झालं ते अज्ञानी लोकांची लक्षणे आहेत. पण हे सगळ्यांना माहित आहे आणि सगळ्यांचा विश्वास आहे की आपल्याला स्वातंत्र्य गे १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले आहे. याला वेगळा काही रंग आणि अर्थ देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतोय तो चूकीचा आहे”, असे मुकेश खन्ना म्हणाले.
https://www.instagram.com/p/CWi6-OtM7T9/?utm_source=ig_web_copy_link
मुकेश खन्ना म्हणाले, “पण मी हे देखील बोलू इच्छितो की हे बोलणं किंवा गाणं गाणे आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.. ही गाणी वास्तविकतेपासून फार लांब आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश सरकारला पळून जाण्याची भीती जर कोणी मनात निर्माण केली असेल तर ते होते देशातील असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेची भीती आणि त्यांच्याच सैनिकांचे बंड.” “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती, अशा तिच्या वक्तव्यामुळे कंगनाला ट्रोल केलं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- …म्हणून परमबीर सिंग लपून बसले आहेत; वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
- …म्हणून देशाने गेल्या ७५ वर्षांत हवी तेवढी प्रगती केली नाही- मोहन भागवत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
