मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर एक एक खळबळजनक खुलासे होत गेले आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना देखील अटक करण्यात आली. यातीलच आणखी एक मोठा व्यक्ति म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambirsingh) यांचा मात्र अजून पत्ता लागलेला नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी साक्ष देत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
सचिन वाझे याला आज चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले. उद्या त्याची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. वाझे आता उद्या कोणता गौप्यस्फोट करतो, याकडे लक्ष लागले आहे. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..
- जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का
- …म्हणून देशाने गेल्या ७५ वर्षांत हवी तेवढी प्रगती केली नाही- मोहन भागवत
- यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….
- मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

