नवी-दिल्ली : काल(२१ नोव्हें.)नवी दिल्लीत एका सभेला संबोधित करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत(Mohan Bhagvat) यांनी या ७५ वर्षात आपण जितकी प्रगती करू शकलो असतो तितकी प्रगती केली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता, असे मत व्यक्त केले आहे.
यावेळी बोलत असतांना भागवत म्हणाले की,’भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. जर आपण असेच करत राहिलो आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले तर भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही.’ तसेच आपल्या संस्कृतीचे एक अंगभूत सामर्थ्य आहे म्हणूनच आपण टिकून राहिलो आहोत. आपण ३००० किमी लांबीच्या प्रदेशात १३० कोटी लोकसंख्येचे राष्ट्र आहोत. प्राचीन ग्रीस आणि रोमच्या संस्कृती नष्ट झाल्या पण भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे. आपल्याकडे एक आदर्श आहे: जगाला शिक्षित करण्यासाठी, जिंकण्यासाठी नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’केवळ निवडणुकीतील तिकिटासाठी समाजसेवा ही सेवा नाही, तर नि:स्वार्थीपणे सेवा करणे हीच खरी सेवा आहे, त्यामुळे केवळ राजकीय हेतूने सेवा करू नये. लोकांनी केवळ जय श्री रामच म्हणू नये, तर प्रभू रामासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील
- ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातय’
- ‘सीएए, एनआरसी मागे घ्या नाहीतर…’, ओवैसींचा मोदी सरकारला इशारा
- विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

