Share

BJP । भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आलीये; भाजपाचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात अनेक घडामोडी घडत असतात. त्यावरून राजकीय वातावरणामध्ये बदल होत असतो. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून सत्ताधारी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. या प्रकरणी भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. त्यातच भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे.

काय म्हणाले तुषार भोसले?

छगन भुजबळांना थेट अंडासेल दाखविण्याची वेळ आल्याचे भोसले यांनी म्हंटले आहे. इतकंच काय तर भुजबळ ही राष्ट्रवादीचे ओवेसी असल्याचा उल्लेख करत तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदू समाजात तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा कट आहे. आणि म्हणून माफी न मागता आपल्या हिंदू विरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या पवारांच्या हस्तकाला पुन्हा एकदा अंडासेल दाखविण्याची वेळ आता आली आहे, अशी जहरी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!