Share

तुळजापूर – शासनाने दिलेल्या परवान्याच्या नावाखाली अवैध साठ्याची वाहतूक

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर : तालुक्यातील नळदुर्ग येथील बसस्थानक समोरील महामार्गावर उभ्या असलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीवरील शासनाने दिलेल्या परवाना वरील क्यु आर कोडची तपासणी केली असता तो अवैध निघाल्याने सदरील जीपचालकासह तिघांजणांन विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

या बाबतीत अधिक माहीती की, शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजता नळदुर्ग येथील बसस्थानका समोरील रस्त्यावर सपोनि वानखेडे हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांनसह पेट्रोलिंग करताना पांढऱ्या रंगाची स्काँर्पिओवर क्रमांक MH13CK1739 वरील काचेवर शासनाने दिलेला पास परवाना असलेली दिसुन आली. त्यानंतर पोलिस तिथे गेले स्कॉर्पिओचा द्यारे पास परवानाचा क्यु आर कोड मोबाईल मधील क्यु आर कोड स्कँन द्यारे नमुद पास वरील क्यु आर कोड स्कँन केला असता सदरचा कोड अवैध असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर  स्कॉर्पिओ चालक तमीम सोहेब काझीरा नळदुर्ग यास सदरचा पास कोठुन मिळवला असे विचारणा केली असता, त्यानै सदरचा पास हा सोहेल कदीर कुरैशी , कुनाल प्रभाकर पासमेल व महेमुद मुजमिल अब्दुल लतीफ शेख रा नळदुर्ग यांच्या मदतीने मोबाईल व वैभवी काँप्युटर टेक्निकल इंन्स्टीयुट नळदुर्ग व महाराष्ट्र दुध डेअरी व मल्टी सर्हीस सेंन्टर नळदुर्ग येथील काँप्युटरचा व प्रिंन्टर्सं चा वापर करुन बनवला असे सांगितल्यानै स्कॉर्पिओ चालक तमीम सोहेब काझी, सोहेल कदीब कुरैशी ,कुणाल प्रभाकर पासमेल यांना तात्काळ ताब्यात घेवुन अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!