Share

उस्मानाबादेत बालविवाहाचा बळी? कमी वयात लग्न आणि मातृत्वाने तिचा जीव गेला

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : लग्नाच्या योग्य वयाची वाट न बघता सामाजिक दबावाखाली मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. याची किंमत मुलींना चुकवावी लागते आणि कधी कधी तर ती जीव गमावून चुकवावी लागते. अशी दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी आणि सोळाव्या वर्षी मातृत्व येऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर सहा लोकांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या 28 वर्षीय तरुणाशी करण्यात आला होता. कोरोना काळात 11 जून 2020 रोजी या दोघांचा विवाह सोहळा उत्तमी कायापुर येथे पार पडला. त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच सदरील मुलगी गरोदर राहिली. 7 ऑक्टोंबर रोजी तिला बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, 13 ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. 14 ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र, 15 ऑक्टोंबर रोजी या अल्पवयीन मातेच्या निधन झालं. कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला.

त्यामुळे या प्रकरणी मुलीचे (वडील) भारत घुगे,(आई) चंद्रकलाबाई घुगे (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे,राम घुगे तर (पती) अजित बोंदर,(सासू) जनाबाई बोंदर,(सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 गुन्हा रजिस्टर नंबर 00/2021 9.10.11. कलमान्वये ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!