उस्मानाबाद : राज्यभरात डान्स बारला बंदी असतांना देखील तुळजापुरात बार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले असून तुळजापूरमध्ये आपण स्त्रीशक्तीचा जागर करतो तर दुसरीकडे डान्स बार सुरू झाला आहे. ही लज्जास्पद बाब आहे, असे ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’तुळजापूर येथे डान्स बार सुरू झाला असून ही लज्जास्पद बाब आहे. आपण तुळजापूर येथे स्त्रीशक्तीचा जागर करतो. पण सध्या दुसरीकडे डान्स बार सुरू झाला आहे. हा डान्स बार बंद करण्यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठविणार आहे.’ तसेच महाविकास आघाडीचे काम चांगले असताना केंद्र सरकारचा ससेमिरा लागला आहे. नतद्रष्ट केंद्र सरकार व त्यामधील भाजपचे राहू केतू यांना सद्बुद्धी द्यावी, असे साकडे त्यांनी तुळजाभवानी चरणी घातलेय’, असेही यावेळी मिटकरी म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या वादावर प्रतिक्रिया देत ते म्हणले की,’शहरांची नावे बदलून विकास होत नाही. औरंगाबाद आणि संभाजीनगर हा मुद्दा महत्त्वाच असला तरी नावे बदलून हिंदू समर्थक किंवा विरोधक ठरत नाही. टप्प्याटप्प्याने नावे बदलू आणि बदलनारच. ज्यांना नावे बदलण्यासाठी वेठीस धरायचे आहे त्यांनी गुजरातमधील नावे मोदी यांच्याकडून बदलून घ्यावी.’
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

