Share

औरंगाबादेतील गर्दीला ‘लक्ष्य’ करणार जिल्हाधिकार्‍यांनी स्थापन केलेली भरारी पथके..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही गर्दी असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात १ याप्रमाणे एकुण नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकाद्वारे गर्दीच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रादेशिक प्रमुखांची बैठक आयेाजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. भारत कदम, प्रभोदय मुळे, श्रीमती संगीता सानप, श्रीमती संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोडगे, स्वप्निल मोरे,  विधाते तसेच सर्व तालुक्यांचे तहसिलदार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात १ याप्रमाणे ९ भरारी पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!