🕒 1 min read
मुंबई: टेकफॉग (Tekfog app) नावाच्या एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून समाजमध्यमांचा गैरवापर केला जात असल्याची गोष्ट उघडकीस आली होती. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या बाबत ट्विट करत ही मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही केंद्र सरकार आणि केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय गप्प का आहे, असा सवाल देखील सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. या टेकफॉग अॅप्लिकेशनद्वारे नागरिकांचे व्हॉटस्अॅप हॅक केले जात असून हा गंभीर गुन्हा असून वैयक्तिक आयुष्यवारील घाला असल्याचेही यावेळी सतेज पाटील म्हणाले आहेत.
It has been brought to my notice that several journalists who were targeted using the #TekFog app are based out of Mumbai. I request them to please come forward to officially file a complaint – @MumbaiPolice & @Mahacyber1 will investigate & take it to a logical end.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 11, 2022
सतेज पाटील ट्विट करत म्हणाले, टेकफॉगद्वारे भाजपने देशातील नागरिकांचे व्हॉटस्अॅप क्रमांक हॅक केले. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून नागरिकांचा वैयक्तिक आधिकार आणि आयुष्यवारील घाला आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर आपल्या सोयीचे मेसेज पासरवण्यासाठी भाजपने या अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे ‘द वायर’ने उघड केले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर ; प्रकृतीत सुधारणा, भाची रचना शहाने दिली माहिती
- मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट; काय आहे प्रकरण जाणून घ्या
- अखिलेश यादवांना मोठा धक्का; काँग्रेससह सपाच्या ‘या’ आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश
- सिडकोवासियांना न्याय देण्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा हवेतच विरली; खा. जलील यांचे प्रशासकांना पत्र..!
- केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्राद्वारे राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
