Share

‘वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली चांडेल या दोघींच्या विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. यावरून आता कंगणाने ट्विटरवरून निशाणा साधला आहे. कंगणाने लागोपाठोपाठ ट्विट करत वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याप्रमाणे स्वतः तुरूंगात जायला तयार असल्याचं म्हटलंय.

कंगणा म्हणते, ‘मी वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांना पूजते. आज हे सरकार मला तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मला माझ्या निर्णयावर गर्व आहे. मी तुरूंगात जाण्याची वाट पाहतेय आहे. हे माझे आदर्श असून त्यांनी जो त्रास सहन केला तो त्रास सहन करण्याची वाट पाहतेय.’ राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला पाडण्यात आला, वीर सावरकारांना तुरूंगात टाकण्यात आलं त्याप्रमाणे मलाही तुरूगांत टाकण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतायत, असंही कंगणा पुढे म्हणालीये.

कंगनाने कॅंडल मार्च गॅंग आणि अवॉर्ड वापसी गॅंगवर ही जोरदार टीका केली आहे. असहिष्णुतावाद्यांना जावून विचारा किती कष्ट सहन केले आहेत या असहिष्णुतावादी देशात,” असा सवाल कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये केला आहे. कंगनाने या ट्विटमध्ये अभिनेता आमिर खानला टॅग केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!