Share

प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का ? – खडसे

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे हे नाराज होते. मात्र, इतकी वर्षे पक्षात राहिल्यानंतर ते आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील असं कोणालाही वाटत नव्हतं. भाजपच्या अनेक नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळंच खडसेंच्या पक्षांतराचा भाजपला धक्का बसला आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. अस असलं तरी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार होते त्या प्रवेशाला चार वाजले. राष्ट्रवादीचं खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल…यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

याला आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे. तर ‘अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे जे गाडीभर नव्हतेच ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणीसांनी पहाटे अजितदादांसोबत शपथ घेतली त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत’ असल्याची टीकाही यावेळी खडसेंनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!