🕒 1 min read
मुंबई- भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर आज मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
गीता जैन यांच्या सेनेत प्रवेश करण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/eFasl7XpEX
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 24, 2020
विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदतही केली होती. जैन शिवसेनेत आल्याने याचा मोठा फायदा शिवसेनेला होणार आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का ? – खडसे
- लोकं काही सुधारेनात : मास्क न लावणाऱ्या लोकांकडून कोट्यावधी रुपयांची दंड वसुली
- कांद्याच्या दरात वाढ : बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती
- खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर
- पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीय – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
