Share

खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर

Published On: 

रत्नागिरी : भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. .खडसे हे नाराज होते. मात्र, इतकी वर्षे पक्षात राहिल्यानंतर ते आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील असं कोणालाही वाटत नव्हतं. भाजपचे अनेक नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळंच खडसेंच्या पक्षांतराचा भाजपला धक्का बसला आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. अस असलं तरी देखील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.

“कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता हा पक्षापेक्षा मोठा होत नाही. त्याची शक्ती ही कार्यकर्त्यांची शक्ती असते. पण शक्ती दाखवणं, ताकद दाखवण्यापेक्षा शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं ताकद दाखवा,” असा खोचक टोला दरेकरांनी खडसेंना लगावला आहे.

“शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश सोहळे, आनंद सोहळे आणि शक्तीप्रदर्शन करत आहात याची खंत वाटते. राज्यातील जनतेला याचा उबग आला आहे. याचे पडसाद नक्की येत्या काळात नक्की उमटतील. ही शक्ती जनतेच्या हितासाठी लावली पाहिजे. शेतकऱ्यांवर संकट असताना अशा संकटमय परिस्थितीत दौऱ्यात असं चित्र उभं करणं हे किळसवाणे आहे,” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!