Share

फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत, त्यांना शुभेच्छा : एकनाथ खडसे

Published On: 

नाशिक:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी तशा आशयाचं ट्वीट करून माहिती शेयर केली आहे.यावर आज जेष्ठ नेते आणि भाजप बंडखोर एकनाथ खडसे यांनी नाशिक दौर्यावर असताना भाष्य केलं आहे.

खडसे म्हणाले की ‘देवेंद्र फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ! भाजपाला सोडचिठ्ठी देऊन खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खडसेंना प्रवेश देण्यात आला.

खडसेंनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड नाराज असल्याच्या बातम्यांवर देखील भाष्य केलं आहे.खडसे म्हणाले ‘तसेच अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली असून कुणीही नाराज नाही.

मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजपा सोडण्याचा फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ आणि थ्रोची पद्धत आहे, अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी भाजपावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!