Share

‘सत्य लवकरच बाहेर येईल’ ; पर्ल व्ही पुरीच्या अटकेनंतर अनिता हसनंदानीची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोट्या पड्यावरील एकता कपूरच्या ‘नागिन’ ही मालिका अनेकांची लोकप्रिय आहे. मात्र या मालिकेतील एक माहिती समोर आली आहे. नागिन’ ही मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. पर्ल विरोधात एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ४ जून रोजी या माहिलेच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली.

पर्लच्या अटकेची बातमी कळताच टीव्ही सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला. पर्लची सहकलाकार अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनी अभिनेत्याचे समर्थन केले आहे. अनिताने इंस्टावर पर्लबरोबर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे. ‘सकाळी उठल्याबरोबर पर्ल व्ही पुरीबद्दल बातम्या ऐकायला मिळाल्या. मी तिला त्याला ओळखते हे खरे नाही. हे खरे असू शकत नाही. सर्व काही खोटे आहे. लवकरच सत्य बाहेर येईल. लव्ह यू पर्ल व्ही पुरी.

https://www.instagram.com/p/CPubXT4gxc7/?utm_source=ig_web_copy_link

अनिताने तिच्या पोस्टसह #ISTANDWITHPEARL शेअर केले. पर्लचे चाहते हे हॅशटॅग ट्रेंड करीत आहेत. अनिता हसनंदानी आणि पर्ल नागीन 3 मध्ये एकत्र काम केले. या शोमध्ये सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना देखील मुख्य भूमिकेत होत्या. या शोच्या स्टारकास्टबरोबर पर्लची चांगली बॉन्डिंग आहे. नागिन 3 हा एकमेव शो आहे ज्यामधून पर्लला स्टारडम मिळाला. पर्लवर झालेल्या बलात्काराचे आरोप किती खरे आणि खोटे आहेत हे पोलिसांच्या तपासणीतच कळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!