कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्य शासनाचे हे पत्रक संविधानाला खीळ बसवणारे असल्याचे एॅड गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवराज्याभिषेक दिनाच्या मुद्द्यावर वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याचा इशारा देखिल गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचे धाडस या राज्यात कोण करू शकतो ? गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
- राज्य सरकारकडून अधिकृत नियमावली जाहीर, सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू
- शिवराज्यभिषेक दिनी शासकीय कार्यालयात भगवा ध्वज उभारण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

