Share

राज्य सरकारची क्रुझवरील पार्टीला परवानगी नव्हती- नवाब मलिक

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच काही आरोप हे वैयक्तिक केल्याने विरोधी पक्षाने नवाब मलिकांवर टीका केली आहे.  यानंतर आता आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. यादरम्यान, या मुंबईतील क्रुझ जहाजामध्ये जी पार्टी झाली त्याला राज्य सरकारची परवानगी नसल्याची माहिती मलिक यांनी दिली आहे.

याबाबत नवाब मलिक म्हणाले, पोलिसांची परवानगी न घेताच ही रेव्ह पार्टी करण्यात आली. धर्माच्या नावावर मला राजकरण करण्याची गरज नाही. आंतराष्ट्रीय ड्रग्ज माफिया रेव्ह पार्टीत होता. येथे ड्रग्ज सापडलेले नाही. जी आयोजित पार्टी करण्यात आली होती. त्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासा. मग काय ते खरं पुढे येईल. या पार्टीत मोठा ड्रग्ज माफिया होता. त्याची का चौकशी झाली नाही. माझी मागणी आहे की, समीर वानखेडे, के पी गोसावी, प्रभाकर साईल आणि समीर वानखेडे यांच्या ड्रायव्हरचा सीडीआर मागवण्यात यावा, असेही मलिक म्हणाले.

दरम्यान,  मुंबईतील क्रुझ जहाजामध्ये जी पार्टी झाली त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो दाढीवाला होता. त्याचा समीर वानखेडे यांच्याशी संबंध आहे. पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि खरे काय ते सांगा, असे थेट आव्हान मलिक यांनी दिले आहे. दरम्यान, वानखेडे यांनी टार्गेट करुन लोकांना यामध्ये पकडले आहे. १३०० लोकांची चौकशी का केली नाही. केवळ १२ ते १३ जणांनाच पकडून त्यांचीच चौकशी का केली. असे प्रश्नही मलिकांनी उपस्थित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!