Share

Trupti Desai : “…तर लोक चप्पलांनी मारतील”, भाजप नेत्याच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओनंतर तृप्ती देसाई संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे भाजप नेते श्रीकांत देशमुख (BJP leader Shrikant Deshmukh) यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेले क्षण टिपण्यात आले आहेत. या व्हिडिओमुळे सोलापूर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी संताप व्यक्त केला आहे.

“सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगले नेता समजले समजले जाता. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसांनी तुम्हाला चप्पलांनी मारतील”, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तसेच सोलापूरच्या या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करणे गरजेचे असून त्यांची पदावरून हकालपट्टी करायला हवी. या विरोधात आपण आवाज उठवला तरच आपल्या घरातल्या मुली त्याच्या हातून वाचतील असेही देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान सदरील व्हिडिओमध्ये महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर बोट दाखवत गंभीर आरोप करत आहे. आज सकाळपासूनच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना कोणतेही कारण दिलेले नाही.

श्रीकांत देशमुख आणि संबंधित महिला एका बेडरुम मध्ये असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झाली आहे. यात संबंधित महिला देशमुख यांच्या विरोधात भाष्य करीत असताना बाजूलाच अंगावर बनियान परिधान केलेले श्रीकांत देशमुख हे तिच्या हातातील स्मार्टफोन बळजबरीने हिसकावून घेताना दिसतात. यावेळी महिला देशमुख यांच्यावर घानेरडे आरोप करताना दिसत आहे. श्रीकांत देशमुख यांनी मला फसवले आहे. त्याच्या पत्नीशिवाय त्याचे माझ्याशीही नाते आहे, असा आरोप महिलेने केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!