Share

Deepali Sayed : “मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तसाच शिंदेंना…”,दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी (राष्ट्रपती निवडणूक) पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतच  शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्वीट करत महत्वाची माहिती दिली आहे.

“द्रौपदी मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावे याकरीता शिंदे यांनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी यासाठी आज भेट होईल.”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून याला शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. यासोबतच शिंदे गट तसेच शिवसेनेने अनेक याचिका कोर्टात दाखल केल्या असून त्यावर अजून सुनावणी होणे बाकी आहे. तर आता दिपाली सय्यद यांच्या ट्वीटमधून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांची मन जुळवणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संकेत दिसून येते आहे.

 एनडीएच्या मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया-

दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले कि, “ज्यांचे संविधान आणि लोकशाहीला समर्थन आहे त्यांचा यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा आहे. आम्हाला कल्पना नाही की शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा देत आहे. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असले तरी त्यांनी याबाबत  आमच्याशी चर्चा केली नाही,” असे  थोरात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!