मुंबई: आषाढी एकादशीनंतर पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आजच्या दिनी गुरुप्रती आभार व्यक्त करतात. यानिमित्तानेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक नेते मंडळी आपल्या गुरुप्रती आदर आणि अबाहर व्यक्त करताना दिसून आले. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पार्श्वभूमीवर शिंदे गटावर निशाणा साधला.
“बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं म्हणत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं.”,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच पुढे संजय राऊत म्हणाले कि, ““रुमध्ये तेज असायला हवे. जे आपले भक्त, शिष्य, समर्थकांना दिशा देईल. ते सर्व बाळासाहेबांमध्ये होतं. आमच्यासारखे लाखो शिवसैनिक त्यांना गुरु मानत होते.”, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेशी बंड करणाऱ्या शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केले आहे. सध्या हे ट्वीट चर्चेत आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : “मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तसाच शिंदेंना…”,दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य
- DeepVeer : रणवीरने ३७ वा वाढदिवस साजरा केला पत्नी दीपिकासोबत; पाहा PHOTO
- Eknath Shinde : “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच”, एकनाथ शिंदेंचे ट्वीट चर्चेत
- Deepak Kesarkar : “राणेंनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे”, दीपक केसरकर यांचे वक्तव्य
- President Election : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

