🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आणि आयटकच्या वतीने घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर कामगार कर्मचाNयांचे नेते र.ग.कर्णिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस र.ग.कर्णिक यांचे शनिवारी राहत्या घरी वृध्दापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने घाटी रूग्णालयात कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू असलेल्या स्थळी श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्र्ट कामगार कर्मचारी संघटनेचे महासचिव अॅड. अभय टाकसाळ, संघटनेचे पदाधिकारी विकास गायकवाड, गजानन खंदारे, अभिजित बनसोडे, सभासद विजय नागोबा, सुनिल गंगावणे ,काळे मामा, बंटी खरात, आम्रपाली जोगदंडे, प्रमिला रत्नपारखे, रोहीत इंगळे,वंदना जोगदंडे,अजय बनसोडे,नंदाबाई हिवराळे आदींची उपस्थिती होती.
श्रध्दांजली सभेत बोलतांना अॅड. टाकसाळ म्हणाले की, कर्णिक हे कामगार-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होते. परंतु ते तुटेपर्यंत न ताणता जास्तीत जास्त कामगारांच्या मागण्या मान्य कशा होतील याकडे त्यांचे सतत लक्ष राहत असे, त्यामुळे त्यांच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. अलीकडच्या काळातील कर्मचाऱ्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण, कामावरून काढुन टाकण्याची निती यामुळे ते व्यथित होत होते. कंत्राटी कामगाराबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता, असे टाकसाळ यांनी यावेळी सांगितले. श्रध्दांजली सभेचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शाखा सचिव महेंद्र मिसाळ यांनी मानले.
महत्वाच्या बातम्या
- एका दगडात दोन निशाणे : अमित शाहांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलं टार्गेट!
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- ‘एक आमदार’ असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे
- फडणवीसांच्या ‘अशा’ विधानांना मी गांभीर्याने घेत नाही – जयंत पाटील
- ‘सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना रेटून खोटं बोलण्याची सवय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
