Share

एका दगडात दोन निशाणे : अमित शाहांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलं टार्गेट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह यांच्या हस्ते सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर अमित शाह हे राज्यात आल्यामुळे ते काय बोलणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं होतं. तर, ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा देखील काही भाजप नेत्यांमुळे पसरली होती.

दरम्यान, अमित शाह यांनी या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे व शिवसेनेवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. शिवसेनेनं देखील निवडणुकांवेळी बॅनरवर नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करून फडणवीसांच्या नेतृत्वात मतं मागितली. यानंतर, त्यांनी पवित्र जनादेशाचा अनादर करून अपवित्र गठबंधन केलं. कुटील राजकारण यावेळी करण्यात आलं. आम्ही तुमच्या मार्गाने नाही चाललो. देवेंद्रभाई मुख्यमंत्री असताना त्याच मार्गाने आम्ही चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्वच राहिलं नसतं. आम्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र कल्याणाच्या मार्गाने चालतो,’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शाहांवर टीका करताना रजनी पटेल, मुरली देवरा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शिवसेना संपली असं विधान केलं होतं. मात्र, यानंतरच्या काळात शिवसेना अधिक बळकट झाली असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे एकाच दगडात त्यांनी दोन निशाणे साधल्याचे चर्चा रंगत आहेत. दरम्यान, हे तिन्ही नेते काँग्रेसचे असून शिवसेनेनं मित्रपक्षाला देखील चुकीच्या विधानांवर टोला लगावला आहे.

‘१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात बहुदा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. तर, 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली,’ अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!