🕒 1 min read
अकोला : महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले आहे. सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत होते.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
फडणवीसांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस यांना मी गांभीर्याने घेत असलो तरी त्यांच्या अशा विधानांना मात्र गांभीर्याने घेत नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांना फासा पलटवण्यासाठी माझ्या शुभेच्छा” असं उत्तर देत राऊतांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’
- ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
