🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दोन महिने उलटून देखील हे आंदोलन सुरु आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या कायद्यांना विरोध केला आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असून मोदी सरकारने शेतकऱ्यांची मागणी ऐकून घ्यावी असं आवाहन पवारांनी केलं आहे.
तर, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल करत हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ऍग्रो लि. द्वारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला प्रोत्साहन देत असल्याची बाब समोर आली होती. यावरूनच भाजप नेत्यांनी पवार कुटुंबियांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल केला होता.
आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांचा एका मुलाखतीमधील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं समर्थन करत असल्याचं दिसून येत आहे. यावरूनच त्यांनी शरद पवार व सुळेंवर बोचरी टीका केली आहे. ‘सुप्रिया सुळे काय बोलतायत ऐका. वडील शरद पवार देखील हेच बोलत होते. आज दोघांनाही स्मृतिभ्रंश झाल्यासारखे नेमकं उलट बोलतायत. कारण रेटून खोटं बोलण्याची दोघांना सवय आहे.’ असा घणघत भातखळकर यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे काय बोलतायत ऐका. वडील शरद पवार देखील हेच बोलत होते.
आज दोघांनाही स्मृतिभ्रंश झाल्यासारखे नेमकं उलट बोलतायत. कारण रेटून खोटं बोलण्याची दोघांना सवय आहे. @supriya_sule @PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/nUr4xjMY1k— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’
- ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
