रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. तर, मराठा समाजाने आंदोलने व अनेक ठिकाणी निदर्शने सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार गांभीर्याने न्यायालयात बाजू मांडत नसल्याची टीका केली जात आहे.
भाजपने देखील राज्य सरकारवर वेळोवेळी टीका केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता महाविकास आघाडीच्या सरकारला ते टिकवता येत नसल्याची टीका भाजपने केली आहे. अशातच, संभाजी ब्रिगेडने मात्र फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
‘मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांच्या काळातील सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारणच केलं. ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण होईल, असं भाजपने बघितलं. संभाजी ब्रिगेडने ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं, अशी मागणी केलीय. एसीबीएसचा कायदा राज्य सरकार करतेय. पण तो अधिकार राज्य सरकारला नाही. ओबीसींचा आयोग केवळ शिफारस करु शंकतं’ अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी चिपळूणमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’
- महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवणं चुकीचं – पालकमंत्री धनंजय मुंडे
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- सव्वा वर्ष लागत का वचन दिल नव्हतं हे सांगायला ? : अरविंद सावंत
- ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
