Share

मंत्री विजय वड्डेटीवारांकडून चिमूर भूमीतील क्रांतिकारी शहिदांना श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चिमूर भूमीतील क्रांतिकारी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या संदर्भात त्यांनी फोटो शेअर करत ट्विट केले आहे की, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधींनी १९४२मध्ये ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठे आंदोलन झाले.तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर येथील स्वातंत्र्य सैनिकांनी रान पेटवले आणि ३ दिवसांसाठी का होईना चिमूर स्वतंत्र झाले.

तसेच ‘भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतच्या स्वातंत्र्याची बातमी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविली होती. आज या ऐतिहासिक भूमीला चिमूर क्रांती दिनानिमित्त भेट देऊन स्मृतीस्थळाला नतमस्तक झालो.असे देखील त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. दरम्यान,चिमूर भूमीतील क्रांतिकारी शहिदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

काय आहे इतिहास?

१६ ऑगस्ट १९४२ ला चिमुरात झालेल्या क्रांतीने चिमूर देशात तीन दिवस स्वतंत्र होते. त्यामुळे चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे.  १६ ऑगस्ट १९४२ ला अभ्यंकर मैदानावर शेकडो क्रांतिकारक गोळा झाले. तिथून प्रभातफेरी काढण्यात आली. बालाजी मंदिर मार्गे व तो दिवस नागपंचमीचा असल्याने नागमंदिर येथे क्रांतिकारक पोहचले. याच दरम्यान इंग्रजांनी डिवचल्याने क्रांतिकारकांनी डागबंगला येथे लपून असलेले इंग्रज अधिकारी सोनवणे, डुंगाजी यांचा या बंगल्यात वध केला तर लोखंडी पुलावर जरासंधचा वध केला. चिमूर शहरात १६ ऑगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!