Share

औरंगाबादेत होणार वृक्षगणना; ‘ट्री सेन्सस’द्वारे कळणार वृक्षांचे लोकेशन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणनेसाठी विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करून लोकसहभागातून वृक्षगणना करण्याचे निर्देश गुरुवारी (दि.२१) औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद शहरातील वृक्षांची नेमकी संख्या आता कळू शकणार आहे. या अॅपचे नाव औरंगाबाद ट्री सेन्सस अॅप ठेवण्याचे त्यांनी यावेळेस सुचविले आहे.

शहरातील वृक्षगणनेबाबत औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद फर्स्ट यांची संयुक्त बैठक प्रशासक दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रशासक म्हणाले की जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादी प्रकल्पात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोबाईल एप्लिकेशन्स विकसित करण्यात आले होते. या एप्लिकेशन्सचा जिओ टॅगिंग डाटा अजूनही उपलब्ध आहे. याच धर्तीवर वृक्षगणना करण्यासाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करून या माध्यमाने लोकसहभागातून वृक्षगणना करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिक आपले परिसर, कार्यालय इत्यादीतील वृक्षांचे फोटो काढून अॅपवर अपलोड करतील.

या कामासाठी कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी, शाळांचे विद्यार्थी, सामाजिक कार्य संस्था यांच्या सहभाग करून घ्यावे, असे ते म्हणाले. हे अॅप १५ नोव्हेंबरपर्यंत विकसित करून २६ जानेवारीपर्यंत वृक्षगणनेचे काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. या बैठकीत शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सुनील काकडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद फर्स्ट तर्फे वास्तुविशारद निकिता राहुजी यांनी हरित औरंगाबाद संकल्पना, हरित पट्टा, वृक्षगणना, बायोडायव्हर्सिटी पार्क, दुभाजक सौंदरीयकरण, ऑक्सिजन हब इत्यादी विषयांवर पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन सादर केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!