🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका कमी झाल्याचे चित्र दिसत असताना येत्या शुक्रवारपासुन शहरातील नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. नाट्यगृहांपाठोपाठ बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. तथापि, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्ये आसन क्षमता ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
यावरच आता मनोरंजन क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. फक्त ५० टक्के आसन क्षमता मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता तसेच राजकीय घडामोडीत सक्रिय असणारा आरोह वेलणकर याने राज्य सरकारला टोमणा लागलावला आहे. तसेच त्यांच्या या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
५० टक्के काय फालतूपणा आहे. बंदच ठेवा मग! काहीही उपयोग नाही ह्याचा. ???????????? अजून किती दिवस असच चालू ठेवणार आहात!??? इतर सर्व राज्यांमध्ये चालू आहे पूर्वीसारखे मग महाराष्ट्रात का नाही?!! https://t.co/4Cs3OIVGH4
— Aroh Welankar (@ArohWelankar) October 21, 2021
आरोह वेलणकराने ट्विट करत लिहिले की, ‘५० टक्के काय फालतूपणा आहे. बंदच ठेवा मग! काहीही उपयोग नाही ह्याचा. अजून किती दिवस असच चालू ठेवणार आहात!??? इतर सर्व राज्यांमध्ये चालू आहे पूर्वीसारखे, मग महाराष्ट्रात का नाही?! असा सवाल करत अभिनेत्याने राज्य सरकारला सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, मात्र ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- विराट कोहलीच्या ‘या’ कृत्यामुळे रोहितची झाली फजिती, क्रिकेटप्रेमींकडून होतेयं टीका
- हातातील कॉफी मगमुळे करीना टिकेस पात्र; व्हिडीओ झाला व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
